नाटकामागची नाट्यपूर्ण गोष्ट!

‘त्या तिघांची गोष्ट’ ह्या मी लिहिलेल्या नाटकाची संहिता पुस्तकरूपामध्ये प्रकाशित होत आहे ह्याचा खास आनंद आहे. ह्या आनंदाचा ‘खास’पणा तुमच्याबरोबर शेयर करण्यासाठी हे प्रस्तावनेचे शब्द . . .

ह्या नाटकाचा पहिला ड्राफ्ट मी लिहिला त्याला आज एका तपाहूनही जास्त म्हणजे सुमारे चौदा वर्षे झाली. त्या वेळी मी नाटकाचे नाव ठेवले होते ‘माझ्यामते’ . . . लेखकाच्या मते त्याची सारीच नाट्यअपत्ये दृष्ट लागण्यासारखी असतात. दोन दिग्दर्शक मित्रांना मी हे नाटक वाचूनही दाखवले. त्यांना ते आवडले. पण पुढे काही झाले नाही.

दहा वर्षांपूर्वी विनय आपटेच्या ग्रुपसोबत नाटक वाचले. विनय भारावून गेला. त्याने एक नोट माझ्या हातात ठेवली आणि म्हणाला, “आनंद हे नाटक मी करणार . . .नट म्हणून आणि निर्माता म्हणून.” रीतसर मुहुर्त झाला. देवेन पेम दिग्दर्शक होता. विनय बरोबर सुहासताई जोशी, केतकी थत्ते . . . तालमी सुरू झाल्या आणि बंद पडल्या. विनयपुढे अडचणींची रास आली. “मी हे नाटक नक्की करणार” असे तो मला सांगायचा. आणि अचानक तोच गेला. आम्हा दोघांना नाटकाचे शास्त्र शिकवणारे एकच . . . विजय बोंद्रे सर! . . . त्यामुळे आज ह्या टप्प्यावर विनयची खूप आठवण येते आहे.

दरम्यानच्या काळामध्ये माझे जन्मरहस्य नाटक करणार्‍या शरद बागवे-अशोक नारकर-दिगंबर प्रभू ह्या निर्मात्यांनी नाटकात रस घेतला. मी ह्यावेळी कुमार सोहोनीला दिग्दर्शनाबद्दल विनंती केली. पण खरा टर्निंग पॉईंट आला जेव्हा शरदने नाटक ऐकले तेव्हा. त्याआधी माझी शरद पोंक्षेबरोबर ओळख नव्हती. नाटक ऐकायला म्हणून तो आणि अश्विनी एकबोटे आले. नाटक वाचून झाल्या क्षणापासून शरद आणि अश्विनीने ह्या नाटकाला (आणि मलाही) अक्षरश: आपले मानलेले आहे . . . शरद हा माणूस त्याच्यातल्या कलाकाराइतकाच झपाटलेला आहे. मनाचा आणि शब्दाचा सच्चा आहे.

1_copyआता सूत्रे फिरायला लागली. सारा संच जमला. तालमी सुरू झाल्या. सगळ्या टीमबरोबर चर्चा सुरू झाल्या. ह्या नाटकामधून नाटककाराला नेमके काय सांगायचे आहे ह्यावर चर्चा झाली. ह्या नाटकातले Take Home messages काय ह्यावर मी एक मुद्देसूद टिपण तयार केले होते. त्यातली काही सूत्रे अशी.

• स्वत:च्या सर्व गुणदोषांसकटचा विनाअट आणि निरोगी स्वीकार ही भावनिक आरोग्याची गुरूकिल्ली आहे. मात्र हा एक आविरत चालणारा प्रवास आहे.

• व्यक्तीच्या मनातली विचारसूत्रे जितकी ताठर, कडक, पोलादी तितकी त्या व्यक्तीच्या विकासाची वाट बिकट होत जाते.

• आपले काही विचार (Beliefs) गोठून गेलेले असतात. तर काही Beliefs मात्र आपण तपासून पहातो. खरे तर सर्व महत्वाची विचारसूत्रे वारंवार तपासून पहायला हवीत. तसे केले तरच नात्यांमधले मतभेद चर्चेने मिटतील.

• पण एकदा विचार पोलादी झाले की त्यांचे बनतात पूर्वग्रह. ह्या पूर्वग्रहांचा भेद करणे वास्तवालाही अनेकदा शक्य होत नाही. माणसे स्वत:च्या भूतकाळाची बंदी बनतात. स्वत:च राखणदार, जेलर, वकील, न्यायाधीश बनतात.

• नात्यांमधला विश्वास दुरावला की आदर, प्रेम उरतच नाही. विश्वास कणाकणाने मिळवावा लागतो पण जायचा तर कापरासारखा भुर्रकन् उडून जातो.hqdefault

• भूतकाळाला स्वत:वर स्वार होऊ जायचे की नाही हा पर्याय प्रत्येकाच्या हातात असतो. परंतु स्वत:ला समंजस मानणारी माणसेही तो वापरतीलच असे नाही.

• माणूस कधीही संपूर्ण आणि परिपक्व नाही आणि नसणार. हे समजून घेता आले तर माणसे एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. स्वत: बरोबर इतरांनाही स्वीकारू शकतात.

ही सगळी सूत्रे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची तर उत्तम टीमवर्कची गरज होती. तो योग ह्या नाटकामध्ये जुळून आला. पहिल्या प्रयोगापासून उदंड प्रतिसाद लाभत गेला. महत्वाचे असे काही पुरस्कार लाभले. महत्वाची गोष्ट अशी की ‘हे नाटक विचार करायला लावते’ अशी प्रतिक्रिया देताना प्रेक्षकांचे डोळे पाणवलेले असायचे. विचार आणि भावना ह्यांना एकमेकांसोबत ठेवणारी प्रतिक्रिया आली की आम्हा सर्वांनाच बरं वाटते.

मी काही मानसशास्त्रावर नाटक लिहित नाही पण माझ्या नाटकांमध्ये मानसशास्त्र येते. मी मनोविकासतज्ज्ञ असण्याशी त्याचा थोडासा संबंध आहे. कारण मी रोज अनेक माणसांबरोबर मन:पूर्वक संवाद साधत असतो. परंतु मी ‘पठडी’मध्ये बसणारा Typical Clinical Psychiatrist नाही ह्याचा मला नाटककार म्हणून जास्त फायदा झालेला आहे.rv1011

ह्या नाटकाची संहिता पुस्तकरूपामध्ये प्रसिद्ध व्हावी अशी इच्छा नाटक पहाणार्‍या अनेकांनी व्यक्त केली. आता ह्या नाटकाचे दिडशेच्या वर प्रयोग झाले आहेत. त्यामुळे नाटक अनुभवण्यासारखे आहे हे नक्की. पुस्तक वाचताना पुन:प्रत्ययाचा आनंद नक्की येऊ शकेल. कदाचित काही अभ्यासू रंगकर्मींना ह्या Documentation चा फायदा होईल. कदाचित् साहित्य आणि मानसशास्त्राचे विद्यार्थी हे पुस्तक वाचतील . . . असे विचार मनात ठेवून मी मॅजेस्टीकच्या अशोक कोठावळ्यांना संहिता पुस्तकरूपात प्रकाशित करण्याची विनंती केली. ती त्यांनी आनंदाने मान्य केली.

व्यावसायिक रंगभूमीवरचे हे माझे सातवे नाटक. पण पुस्तकरूपात प्रसिद्ध होणारे मात्र ‘जन्मरहस्य’च्या नंतरचे हे दुसरेच. मला माझ्या लहानपणापासून नाटकाची पुस्तके वाचायला आवडायचे. कधी मी पुस्तक वाचून नाटके पाहिली आहेत तर कधी उलट्या क्रमाने . . . आता मला जाणवते की नाट्यमाध्यमाचा माझा नेणता अभ्यास हा असा सुरू झाला असणार. तेव्हा ठाऊकही नव्हते की एक दिवस आपण लिहिलेल्या नाटकाचेही पुस्तक निघेल म्हणून!

मला अनेक जण विचारतात तुमच्या नाटकामध्ये तुमचे व्यक्तीगत जीवन आणि अनुभव येतात का? . . . त्याचे उत्तर होकारार्थी आहे. मात्र मी काही माझ्या जीवनावर नाटक लिहित नाही. नाटकाचा पैस इतका विलक्षण असतो . . . त्यातली व्यक्तिरेखा दिसायला लागते तेव्हा ती अंशत: स्वयंभू असते आणि अंशत: माझ्या जगण्याचा भाग घेऊन आलेली. पण पहिल्या प्रयोगापर्यंत ती पूर्णपणे ‘जिवंत व्यक्ती’ झालेली असते . . .As unique as everyone of us . . . नाट्यमाध्यमातली सर्वांत थ्रीलींग गोष्ट कोणती वाटत असेल माझ्या लेखकमनाला तर ती ही . . . ते wow feeling!. . . तो क्षण अनुभवण्यासाठी मी नाटके लिहितो असं म्हणालात तरी चालेल . . .

. . प्रेक्षकांसमोर अनेकवार सादर केलेली ही नाट्यकृती आज पुस्तकस्वरूपात रसिक वाचकांसमोर येत आहे . . . मुखपृष्ठाचा पडदा उघडला आहे. पहिल्या पानावरचे शब्द तुमच्या डोळ्यांच्या प्रकाशात उजळून निघत आहेत . . . रंगभूमीचा श्वास वाचकाच्या श्वासामध्ये मिसळून जात आहे . . . त्या तिघांची गोष्ट आता तुमचीआमची-सर्वांची बनली आहे.

– डॉ.आनंद नाडकर्णी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s